टाकळीवाडी येथे ऐतिहासिक बुरुज वाचवण्यासाठी युवकांचे उपोषण सुरू……

शिरोळ (नामदेव निर्मळे ) : टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील ऐतिहासिक बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गावामध्ये आता एकच बुरुज शिल्लक राहिलेला आहे.. शिवगर्जना तरुण मंडळाने वारंवार याकडे लक्ष वेधले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे गावांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

सोमवारपासून शिवगर्जना तरुण मंडळाने आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा दुसरा दिवस उपोषण चा आहे. लेखी आश्वासनानंतर आम्ही माघारी घेणार असा ठाम निर्णय शिवगर्जना तरुण मंडळाने घेतलेला आहे. उपोषण साठी निशांत गोरे, श्रीमंत एक्संबे, कृष्णा कोळी, भरत सलगरे, दत्तात्रय बदामे ,निलेश वनकोरे, सुधीर गोरे, लक्ष्मण चिगरे आधी युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

गावातील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन मोजणी करून हा विषय संपतो असे आश्वासन मिळाले होते. परंतु अद्यापही पूर्ण झालेली नाही. जाणून बुजून या बुरुजाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा अशी शिवगर्जना तरुण मंडळाची इच्छा आहे. त्वरित मोजणी करून बुर्जाचे संवर्धन व्हावा अशी समस्त मागणी गावकऱ्याकडून होत आहे.