अनिल अंबानींची कंपनी दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर…

मुंबई :हिंदुजा ग्रुप सध्या निधी उभारण्यासाठी खासगी क्रेडिट फंडांशी चर्चा करत आहे. हिंदुजा ग्रुपने 6,560 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. ही रक्कम रिलायन्स कॅपिटलच्या खरेदीसाठी वापरली जाणार आहे.

रिलायन्स कॅपिटल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. हिंदुजा ग्रुपने कंपनीसाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. मात्र, हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणाची सुनावणी या आठवड्यात होणार आहे. हिंदुजा समूहाने रिलायन्स कॅपिटलसाठी 9,800 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.यापूर्वी टोरेंट इन्व्हेस्टमेंटने सर्वाधिक बोली लावली होती.

रिलायन्स कॅपिटलने सुमारे 22 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. DGGI द्वारे रिलायन्स कॅपिटलच्या उपकंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सकडे 922 कोटी रुपयांची कर नोटीस पाठवली आहे. याचा रिलायन्स कॅपिटलच्या मूल्यांकनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचे नोबेल, श्रमिक महिलांसाठी केले मोठे कामअनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कॅपिटल एकेकाळी देशातील सर्वात मोठी खासगी वित्त कंपनी होती. ती शॅडो बँकेसारखी काम करत होती, कंपनीने सरकारच्या पीएफ निधीचा काही भागही सांभाळला होता. ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी’,

ही रिलायन्स कॅपिटलचा एक भाग होती, कंपनी देशातील सर्वात मोठ्या खाजगी विमा कंपन्यांपैकी एक होती.हिंदुजा ग्रुप रिलायन्स कॅपिटलच्या खरेदीसाठी निधी जमवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ग्रुपने यापूर्वी एका वित्तीय संस्थेकडून कर्ज उभारण्याबाबतही चर्चा केली होती. हिंदुजा ग्रुपचा व्यवसाय आर्थिक क्षेत्रापासून रसायन क्षेत्र आणि रिअल इस्टेट क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे.