कोल्हापूर: साळोखेनगर येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजमधील रिसर्च आणि डेव्हलपमेंट अधिष्ठाता डॉ. शिवानी काळे यांच्या “द अॅबंडंट पाथ: अनलीशिंग द पॉवर ऑफ मनी मॅनिफेस्टेशन” या पुस्तकाचे प्रकाशन डी वाय पाटील ग्रुप कोल्हापूर चे कार्यकारी संचालक डॉ.ए.के. गुप्ता यांच्या हस्ते झाले.
यावेळी साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ.अभिजीत माने, प्राचार्य डॉ.सुरेश माने उपस्थित होते.”द अॅबंडंट पाथ: अनलीशिंग द पॉवर ऑफ मनी मॅनिफेस्टेशन” हे पुस्तक म्हणजे झटपट पैसे कमवण्याची साधन नसून स्वतःच्या क्षमता ओळखून सशक्तीकरणातून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग आहे. आपल्या क्षमतेच्या मर्यादा ओलांडून सहजतेने समृद्धीकडे आकर्षित होण्याची मानसिकता स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.
यावेळी डी वाय पी ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ.अनिल गुप्ता यांनी डॉ. काळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी अभिनंदन केले.