शासकीय रुग्णालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार : मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : राज्यात किमान पाच मोठ्या शासकीय रुग्णालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार असल्याचे, प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री असं मुश्रीफ यांनी केले.

अत्याळ ता. गडहिंग्लज येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शासकीय रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रिया होत नाहीत, प्रत्यारोपण व्यवस्था नाही. गोरगरिबांना परवडेल यासाठी राज्यातील २७ पैकी महत्वाच्या पाच ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात येत्या तीन ते चार महिन्यात लिव्हर व किडनी प्रत्यारोपण सुविधा सुरू करणार आहोत. नांदेडसारख्या दुर्दैवी घटना राज्यात पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासह त्या सुसज्ज करण्याचे कार्य आता शासन हाती घेत आहे. शासकीय रुग्णालयांवर नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त ताण असतो. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाबरोबरच जर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अधिक बळकट केली तर जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल. यातून गरजूंना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळेल

यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३० हजार नागरीकांना आरोग्य सुविधा……..अत्याळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण होत असल्यामुळे अत्याळसह नजीकच्या बेळगुंदी, इंचनाळ, कौलगे, हीरलगे, ऐनापुर, करंबळी व गिजवणे गावातील अंदाजे ३० हजार नागरिकांना आरोग्याच्या सोयी- सुविधा जवळच मिळणार आहेत.

यावेळी विजय मोहिते, जयसिंग पाटील, शाहीर शंकरराव बाटे, आप्पासाहेब पाटील, प्रकाश माने, विजय पाटील, हीरलगेचे सरपंच सचिन देसाई, संजय गाडे- कौलगे, संभाजी पाटील व के. बी. पोवार- करंबळी, आनंदराव पोवार- इंचनाळ, शिवाजीराव राणे व मिलिंद मगदूम- बेळगुंदी, गिजवणेचे उपसरपंच नितीन पाटील, आदित्य पाटील, रमेश पाटील, टी. एस. देसाई व सदाशिव देसाई -ऐनापुर आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत पृथ्वीराज पाटील यांनी केले. प्रास्ताविक एस. आर. पाटील यांनी केले. आभार प्रा. जयवंत पाटील यांनी मानले.