मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मुश्रीफ यांच्या कुटुंबाशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटंट (CA) महेश गुरव याचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए न्यायालयाने फेटाळला.त्यावेळी जमा केलेला पैसा मुश्रीफांच्या मुलांच्या कंपन्यात वळविला असल्याचे निरक्षण न्यायालयाने नोंदविले.

कोल्हापूर येथील संताजी घोरपडे साखर कारखान्यातील लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे.

हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय यावर ईडीने यापूर्वीच छापे टाकले आहेत.आता पीएमएलए न्यायालयाने 46 वर्षीय महेश गुरव याचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी मुख्य आरोपी हसन मुश्रीफ आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांमधून कमावलेल्या आणि गोळा केलेल्या पैशाची ठोस माहिती महेश गुरवकडे असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

सीए म्हणून काम करत असताना गुरव याने हे भल्या मोठ्या रकमेची व्यवस्था लावण्याचा मार्ग शोधून काढला होता. हे पैसे त्याने शेल कंपन्यांमध्ये वळवले गेले आणि या कंपन्यांचे संचालक हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत. हा व्यवहार स्पष्ट करणाऱ्या या कंपन्यांचा ऑडिटर / सीए महेश गुरवच आहे, असे पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी देशपांडे यांनी 27 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यातील भागभांडवल देतो, असे म्हणत 2011 साली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पण त्यांनी या शेतकऱ्यांना शेअर सर्टिफिकेट दिलेले नाही, तसेच त्याचा लाभही या शेतकऱ्यांना देण्यात आलेला नसल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर मुरगूड पोलीस ठाण्यात विवेक कुलकर्णी यांनी गुन्हा दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी लोकांची 40 कोटींची फसवणूक केल्याचे कुलकर्णी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

🤙 8080365706