मुंबई शहरातील गोरेगाव येथे इमारतीला भीषण आग 39 जण जखमी तर 7 जणांचा मृत्यू…

मुंबई : मिळालेल्या माहितीनुसार या आगीत आतापर्यंत 07 जणांचा मुत्यू झाला आहे तर तब्बल 39 जण भाजले आहे. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथील आझाद नगरमध्ये असणाऱ्या समर्थ नावाच्या 7 मजली इमारतीला काल रात्री 2.30 ते 3 च्या दरम्यान भीषण आग लागली.

इमारतीच्या पार्किंगमध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, आगीत जखमी झालेल्या एकूण 46 जणांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला असून 39 जणांवर एचबीटी आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींना कोठे नेण्यात आले त्या इतर खाजगी रुग्णालयांकडून तपशीलाची प्रतीक्षा आहे.आगीत 7 ठार, 39 जण जळालेगोरेगाव येथील आझाद नगर येथील समर्थ नावाच्या 7 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 7 जणांना जीव गमवावा लागला आहे.

बीएमसीने या दुर्घटनेबाबत निवेदन जारी करून म्हटले आहे की गोरेगावमधील 5 मजली इमारतीला लेव्हल 2 ला आग लागल्याने 39 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे.इमारतीच्या पार्किंगमध्ये बरेच जुने कापड ठेवले होते, त्यामुळे आग लागली असावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पार्किंग क्षेत्रात आगइमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4 कार आणि 30 हून अधिक बाइक पूर्णपणे जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले.सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. मात्र, आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दल करत आहेत.