नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलल ताप आला असून शुभमनला डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र तर 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे.
भारताचा सध्याचा सर्वात यशस्वी फलंदाज शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला गिलच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. कारण यंदाच्या मोसमात गिल जबरदस्त फॉर्मात आहे.भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिला सामना रविवारीभारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला सामना रविवारी चेन्नईत खेळवण्यात येत आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघानं काल चिदंबरम स्टेडियमवर कसून सराव केला. पण भारतीय संघाच्या त्या सराव सत्रातून शुभमन गिलला माघार घ्यावी लागली. आता रविवारच्या सामन्यात तो खेळू शकतो की नाही याचा निर्णय आज होणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांनंतरच घेण्यात येईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गिल खेळू शकला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशन किंवा लोकेश राहुलला सलामीला बढती देण्यात येईल.
शुभमन गिल हा यंदाच्या कॅलेंडर वर्षातला भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्यानं या वर्षात एका द्विशतकासह वन डेत पाच शतकं झळकावली आहे. साहजिकच या वर्षात त्याच्या नावावर धावांचा डोंगर उभा राहिला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषकातही त्यानं सर्वाधिक 302 धावा फटकावल्या आहेत. यंदाच्या आयपीएल मोसमात त्यानं सर्वाधिक 890 धावा कुटल्या होत्या.