कोल्हापूर : विविध विकास कामांच्या माध्यमातून सुर्वेनगर परिसराचा कायापालट सुरु आहे. या परिसरातील विकास कामासाठी यापुढेही आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. ९ लाखांच्या निधीतून करण्यात येत असलालेल्या सुर्वेनगर परिसरातील बुध्दिहाळकर नगर ते प्रथमेश नगर अंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महानगरपालिका क्षेत्रातील सुर्वेनगर अंतर्गत बुध्दिहाळकर नगर ते प्रथमेश नगर येथील अंतर्गत रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती. आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून या कामासाठी ९ लाख १२ हजार रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून सुवर्णा शिंदे ते कोळी घर तसेच निलीमा नलगे घर या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत बुध्दिहाळकर नगर आणि प्रथमेश नगर परिसरातील महिलांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, मतदार संघात चांगले रस्ते व्हावेत यासाठी आपले प्राधान्य आहे. उपलब्ध निधीच योग्य पध्दतीने वापर करा, दर्जेदार काम करा अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार पाटील यांचे आभार मानले.
यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, अभिजित खतकर, बाळासाहेब देसाई, सुवर्णा शिंदे, विद्या बारड, सुमन मोहिते, पूर्वा आंबोळे, स्नेहा कुलकर्णी, महापालिका नगर रचना विभागाचे एन. एस. पाटील तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यक़र्ते उपस्थित होते.