राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथील पक्ष कार्यालयात देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या महामानवांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रीं यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी पक्ष प्रवक्ते अनिल घाटगे यांनी आपल्या व्याख्यानाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या महान कार्याला उजाळा दिला, गांधींनी अहिंसेच्या तत्त्वाने संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना भारतातून हाकलण्याचे महान कार्य केले तर लालबहादूर शास्त्री म्हणजे शांत, संयमी आणि आदर्शवादी व्यक्तिमत्त्वाचा उत्कृष्ट नमुना असुन त्यांनी आपल्या करारीपणाने 62च्या युद्धात पाकिस्तानचे कंबरडेच मोडले होते. अशा या मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेल्या पंतप्रधानांचा ताश्कंद येथे झालेल्या आकस्मित निधनामुळे भारत एका आदर्शवादी पंतप्रधानाला मुकला.

यावेळी पक्षाचे सरचिटणीस सुनिल देसाई यांनी सर्वाचे स्वागत तर आभार गणेश जाधव यांनी मानले तसेच रियाज कागदी, महादेव पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, फिरोज सरगुर , चंद्रकांत सूर्यवंशी, श्रीकांत पाटील, सरोजनी जाधव, अरुणा पाटील, गणपतराव बागडी, निलेश मछले सुरज कोराणे, रेहाना नागरकट्टी, नागेश फरांडे, राजू जमादार, रामराजे बदाले, सादिक आत्तार, फिरोज खान उस्ताद, बेनझीर नदाफ, जैद शेख मुसाभाई कुलकर्णी, लहुजी शिंदे, राजाराम सुतार, राजेंद्र पाटील,, संदीप साळोखे,मंगल कट्टी आणि नितीन मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.