हैद्राबाद येथे होणाऱ्या रिपाइंच्या 67 व्या वर्धापन दिनासाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रवाना

कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन तेलंगणा येथील हैदराबाद मध्ये होत असून या वर्धापन दिनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते हैदराबादला रवाना होण्यासाठी निघाले.

शासकीय विश्रामगृह कसबा बावडा कोल्हापूर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमल्यानंतर जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो… ‘आठवले साहेबांचा विजय असो… ‘एकच वादा उत्तमदादा… अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला व गाड्यांचा ताफा विश्रामगृह येथून निघाला.

यावेळी राज्य सचिव मंगलराव माळगे,प.म.उपाध्यक्ष बी.आर.कांबळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, करवीर तालुध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर,कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, गगनबावडा तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, शाहुवाडी तालुकाध्यक्ष विश्वास सरूडकर, कागल तालुध्यक्ष बाबासाहेब कागलकर, नामदेव कोथळीकर, सचिन मोहिते, संभाजी कांबळे, किशोर तिसंगीकर,अतुल सडोलीकर, सचिन कांबळे, विजय कांबळे, यशवंत कोदेकर, अभिजीत कोगले,वैभव प्रधान,यश फुले,गुलाब मधाळे,जितेंद्र कांबळे आदी. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.