कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वांत बँकेची शाखा लाईन बझार येथील नवीन वास्तुत स्थलांतरीत करण्यात आले असुन त्याचे उद्घाटन आज करण्यात आले. निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुरेश पवार आणि दु़ंडापा घोलराखे यांच्या हस्ते करणेत आले.
या वेळी बँकेचे माजी अध्यक्ष व कोल्हापूर महानगरपालिका सभागृह उपनेते चंद्रकांत घाडगे, हिंदू समाज लाईन बाजारचे सरपंच आनंदराव जाधव, उपसरपंच विष्णू पडवळे, लक्ष्मण गायकवाड, गजानन शिरसागर, सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भोसले, उपाध्यक्ष राहुल गावडे यांचेसह सर्व संचालक व भागातील प्रतिष्ठित नागरिक विलास घाडगे ,तानाजी देसाई , सय्यद इजाज शेख, तसेच महादेव जाधव ,मोहन घाडगे या मान्यवरांचे तसेच सभासद यांच्या उपस्थितीमध्ये लाईन बाजार येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री सुरेश पवार निवृत्ती पोलीस उपाधीक्षक यांचा सत्कार बँकेचे विद्यमान अध्यक्ष अतुल जाधव यांच्या हस्ते तर श्री दुंडाप्पा घोलराखे निवृत्ती पोलीस उपाधीक्षक यांचा सत्कार संचालक रवींद्र पंधारे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे संचालक शशिकांत तीवले यांनी उपस्थित सभासद ठेवीदार यांचे स्वागत केले.
शाखाध्यक्ष रमेश घाडगे, सदानंद घाडगे, संजय खोत, किशोर पवार ,व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे या वेळी उपस्थित होते