कै. भगवानराव सरनोबत पुण्यतिथीदिनी सीपीआरला हायड्रोलिक ट्रॉली प्रदान

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील व परिसरातील कचरा उचलण्यासाठी दोन हायड्रोलिक ट्रॉलींची गरज होती. त्यापैकी एक ट्रॉली कै. भगवानराव सरनोबत -आण्णा यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त सरनोबत कुटुंबीयांकडून देण्यात आली. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी ती स्वीकारली.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, आठवड्यापूर्वीच सीपीआर रुग्णालय व परिसरातील कचरा उठावासाठी दोन हायड्रोलिक ट्रॉलींची गरज, अशी बातमी वृत्तपत्रांमधून आली होती. त्याची दखल घेत कै. भगवानराव सरनोबत कुटुंबियांच्यावतीने तातडीने एक ट्रॉली छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान देण्यात आली.सामाजिक कार्यासाठी दाखविलेले सरनोबत कुटुंबीयांचे हे दातृत्व कौतुकास्पद आहे.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, डिसेंबर महिन्यामध्ये शेंडा पार्क येथील अकराशे बेडच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचा पायाभरणी समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे.

यावेळी पन्हाळ्याचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, करणसिंह सरनोबत, ॲड. अद्वैत सरनोबत, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब शेलार, कृष्णा पोवार, विजय डुबुले, पंकज शिंदे, संजय पाटील, भगवान पाटील, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौ. सुप्रिया देसाई, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, संजय बनगे, भानुदास पोवार, रणजित सरनोबत आदी प्रमुख उपस्थित होते.