टेनिस मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा – ऋतुजा भोसले या जोडीला सुवर्णपदक

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस मिश्र दुहेरीत आज भारतीय जोडी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी इतिहास रचला.

त्यांनी चिनी तैपेईची जोडी त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग यांना ट्रायब्रेकरमध्ये २-६, ६-३,१०-४ अशा सेटमध्ये हरवत सुवर्णपदक जिंकले. पहिला सेट हरल्यानंतर रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी जोरदार कमबॅक केले. त्यानंतर ट्रायब्रेकरमध्ये त्यांनी चिनी तैपेईच्या जोडीवर मात केली.

जकार्ता २०१८ मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण जिंकल्यानंतर बोपन्नाचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांना पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या अकगुल अमानमुराडोवा-मॅक्सिम शिन यांचा ६-४, ६-२ असा पराभव केला होता.