भारताची आणखी एक सुवर्ण कामगिरी; एअर पिस्टल मध्ये आणखी एक सुवर्ण

चीन : चीनमध्ये होत असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेमध्ये भारताची पदकांची लयलूट सुरूच आहे. आता 10 मीटर एअर पिस्टल क्रीडाप्रकारात पुरूषांच्या टीमने सुवर्ण कामगिरी केली आहे. सांघिक क्रीडाप्रकारात सरबजोत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवाल या तिघांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे.

आजच्या दिवसाची सुरुवातच भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवत केली आहे. थोड्याच वेळापूर्वी भारताच्या रोशिबिना देवी हिने वुशू क्रीडाप्रकारात रौप्य पदक मिळवलंं होतं.वैयक्तिक पदकांकडे लक्ष10 मीटर एअर पिस्टल या सांघिक क्रीडाप्रकारात भारताच्या टीमने सुवर्णपदक मिळवलं आहे.

यामध्ये सरबजोत आणि अर्जुन यांनी अनुक्रमे पाचवा आणि आठवा क्रमांक पटकावला. यामुळे हे दोघेही वैयक्तिक शूटिंगमध्ये अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे आता या दोघांनाही वैयक्तिक क्रीडाप्रकारात पदक मिळण्याची आशा आहे.

🤙 9921334545