छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारातील मोठे झाड कोसळले….

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या परिसरात वेदगंगा या इमारती समोरील मोठे झाड रात्री सव्वा बारा वाजता कोसळले. यावेळी कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

वेदगंगा ट्रामा आयसीयू समोरील हे मोठे झाड कोसळल्यामुळे सुरक्षारक्षक, रुग्णांचे नातेवाईकही यानी घटनास्थळी ठिकाणी धाव घेतली. यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले आणि जवानांनी रात्री दीड वाजेपर्यंत रस्ता मोकळा केला. या झाडाच्या अलीकडे एक रुग्णवाहिका अडकून पडली होती.

सकाळपासून उर्वरित झाड कापून हा रस्ता पूर्ण मोकळा करण्याचे काम सुरू होते. दिवसा या परिसरामध्ये रुग्ण नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मोठ्या प्रमाणावर वाने येथे लावलेली असतात. जर दिवसा झाड पडले असते तर मात्र गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले असते.