बालिंगा (प्रतिनिधी) : बालिंगा. (ता. करवीर ) येथील क्रांती बॉईज मंडळ माळवाडी या मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तसेच गेली २३वर्षे झाली महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंडळातर्फे विविध विधायक कार्यक्रम घेतले जातात. व्रद्धाश्रमामध्ये फळे वाटप, स्मशान भूमी स्वच्छता, रक्तदान शिबीर आदिसह विविध उपक्रम घेतले जातात.
यावर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे शुभ हस्ते श्रीची आरती केलीच पण गावातील ग्रामपंचायतीचा उपेक्षित सेवक वर्ग गावाची विन्रमपणे सेवा करतात याची या मंडळाने दखल घेऊन गेल्या दोन वर्षांपासून या सेवाभावी सेवकांच्या हस्ते श्री ची आरती केली जाते. तसेच या सेवकांना कायमस्वरूपी आरतीचा मान दिला जाणार आहे,असे मंडळातील कार्यकर्ते यांनी आवर्जून सांगितले. या सेवक वर्गामध्ये लिपिक, शिपाई पासून ते नळपाणी पुरवठा सेवक, प्रामुख्याने कचरा वाहतूक सेवक यांना या श्री च्या आरतीचा मान दिला जातो.
आज श्रीच्या आरतीचा मान ग्रामपंचायतीचे क्लार्क विजय जत्राटे, अक्षय कांबळे, पाणीपुरवठा सेवक संतोष कांबळे, संदिप कोरवी, सुरेश पोवार, अशोक राजेशीर्के,कचरा वाहतूक सेवक रघुनाथ कांबळे यांना देण्यात आला. यावेळी मंडळाचे आधारस्तंभ समाजीक कार्यकर्ते शिवाजी वाडकर, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.