महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री ही व्यक्ती असणार ; अनिल देशमुख यांचा दावा…

मुंबई : पुढील वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांचं नाव घेतात, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं ठामपणे सांगतात.

पण, शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी वेगळा दावा केला.महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

ते म्हणाले की, ‘शिंदे गटाचे आमदार म्हणतात की 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार तर भाजपाचे आमदार म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, परंतु 2024 मध्ये ना फडणवीस ना शिंदे फक्त राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार!’

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न आहे. येत्या काळात शिंदे गट, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. पण, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून आघाडी तयारी केली.