राधानगरी : (अरविंद पाटील) गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात तरुण, आबालवृद्धांनी शनिवारी लाडक्या गणरायला निरोप दिला. गेल्या पाच दिवसांपासून घराघरात असणारी गौरी गणपतीची लगबग आज संपली.
काही वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, संस्था तसेच स्थानिक प्रशासनही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य देत आहे. या संस्थांना साद घालत नदी घाटावर शेकडो भक्तांनी लाडक्या बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन करुन गणेश मुर्ती ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केल्या. ग्रामपंचायतीच्यावतीने चार ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्यामुळे नदी प्रदूषित होऊ नये यासाठी
ग्रामपंचायतीकडुन विशेष काळजी घेतली होती. हजारो भक्तांनी पर्यावरणासाठी सामाजिक संस्था व ग्रामपंचायतीला सहकार्य केले. गेले पाच दिवस गणरायाची सेवा करून भक्तिरसात न्हाऊन निघाल्यानंतर गणरायाला निरोप देण्यासाठी शनिवारी दुपारपासून सुरू झालेला विसर्जनाचा सोहळा भावपूर्ण वातावरणात, साश्रू नयनांनी आणि ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात सायंकाळी सहा वाजता संपला.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.