
केळी हे असेच एक अन्न आहे जे जगभरात मोठ्या उत्साहाने खाल्ले जाते आणि प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असते. कच्ची केळी खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
आजकाल आपल्या शरीरालाही आरबट चरबट खाण्याची सवय लागलीय. त्यामुळे हमखास पचनसंस्थेवर परिणाम होतो. या आजारावर कच्ची केळी गुणकारी आहेत. कच्च्या केळीमध्ये भरपूर फायबर आणि प्रतिरोधक स्टार्च असतात. या दोन्हीमुळे पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते तसेच अन्न लवकर पचण्यास मदत होते.आजकाल हृदयविकाराच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. कच्च्या केळ्यामुळे हृदय निरोगी राहते. कच्च्या केळ्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आढळते, ज्यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येते.मधुमेह असलेल्या लोकांसाठी फळे खाण्यावर बरेच नियम असतात. अशा लोकांसाठी कच्चे केळीचे सेवन मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटी-डायबेटिक गुणधर्म देखील मधुमेहाची समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.केळी हे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. कच्च्या केळ्यामध्ये काही प्रमाणात फायबर आढळते आणि फायबर लवकर पचत नाही. ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे आपल्याला जास्त खाणे टाळता येते आणि वजन नियंत्रित ठेवता येते.
