अतिरिक्त तेल सेवनाचे दुष्परिणाम

भारतीय खाद्य संस्कृती मध्ये तेल हा अनन्य साधारण महत्व असलेला घटक आहे. तेलामुळे तयार करत असलेल्या पदार्थाची चव तर वाढतेच पण त्यासोबतच त्याचा रंग , पोत सुधारतो.पंण अतिरिक्त तेल सेवनाचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का.?

तेल हा खाद्य पदार्था मधला महत्त्वपूर्ण घटक असला तरी कुठल्याही गोष्टींचे अतिरिक्त प्रमाण हे वाईट! तेलामुळे शरीरातील फॅटचे प्रमाण वाढते, रक्तातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्तदाब, रक्त वाहिन्या गोठणे, हृदयविकारासारख्या पाहुण्यांना आपले शरीर आमंत्रण देऊ लागते. लठ्ठपणा, मधुमेह, इंसुलिन, फॅटी लिवर यांसारख्या अनेक शारीरिक व्याधी तेलाच्या अतिरिक्त वापराने जडण्याची शक्यता असते.

दिवसाला सरासरी किती प्रमाणात तेलाचा वापर केला तर तो अतिरेक होणार नाही आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही असा प्रश्न खाद्यपदार्थ व आरोग्य यांच्या बाबतीत जागरूक असलेल्या नागरिकांना नेहमी पडतो .आहार तज्ञ व्यक्तींच्या मते प्रौढ व्यक्तींनी उत्तम आरोग्यासाठी दिवसभरात ४ चमचे म्हणजे साधारण २० ग्रॅम तेलाचे सेवन केले पाहिजे.हे प्रमाण स्त्री व पुरुष दोघांसाठी ही थोड्या फार प्रमाणात सारखेच असते. ज्या व्यक्तींना लठ्ठ पन्ना टाळून आपले वजन आटोक्यात ठेवायचे आहे किंवा कमी करावयाचे आहे अशा लोकांनी १ चमचा किंवा त्याहीपेक्षा कमी तेलाचे सेवन केले पाहिजे.

🤙 8080365706