मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबई : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

मुंबईसह राज्यातील पर्यटनाच्या वृध्दीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. असेही ते म्हणाले.

या उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. यानिमित्त मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी महिंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय या फाऊंडेशनमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते सचिन पिळगावकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे.