ब्रेकफास्ट करताना या चुका टाळा

आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ब्रेकफास्ट हा सर्वात महत्त्वाचा ठरतो, कारण त्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते. अशा परिस्थितीत नाश्ता किंवा ब्रेकफास्ट करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे आरोग्यासाठी अपायकारक ठरेल.

काही लोक सकाळी उठताच चहा किंवा कॉफी पितात. मात्र ही सवय अतिशय अयोग्य आहे. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केले तर शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढू शकते ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. याशिवाय सकाळी कॉफी प्यायल्याने हार्मोनल संतुलन बिघडते आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी फळांचे ज्यूस पिण्याची सवयही घातक ठरू शकते. दिवसभरात तुम्ही ताज्या फळांचा रस पिऊ शकता. पण सकाळी रिकाम्या पोटी फ्रूटज्यूस पिण्याची चूक बिलकूल करू नका. कारण यामुळे शरारातील साखरेच्या पातळीचे संतुलन बिघडू शकते. ज्यूस प्यायचाच असेल तर ब्रेकफास्ट केल्यानंतर त्याचे सेवन करावे.जंक फूडकाही लोकं सकाळी-सकाळी ब्रेकफास्टमध्ये सँडविच खातात. पण चांगले आरोग्य हवे असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये फास्ट फूड किंवा जंक फूडचे सेवन करू नका. सँडविच, पिझ्झा, बर्गर आणि सॉसेज वगैरे पदार्थ खाऊन शरीरातील फॅट्स वाढू शकतात. त्यामुळे सकाळी अशा पदार्थांचे सेवन न करणेच उत्तम ठरते.व्हाईट ब्रेडजगभरातील बहुतांश लोक हे सकाळी नाश्त्यामध्ये व्हाईट ब्रेडचे सेवन करत असतात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते असे करणे अतिशय घातक ठरू शकते. खरंतर पांढरा ब्रेड हा मैद्यापासून बनतो, आणि त्याच्या जास्त सेवनामुळे तुमचे पाचनतंत्र बिघडू शकते.तसेच त्यामध्ये पोषक गुणधर्मही अतिशय कमी असतात. म्हणून तो जास्त खाऊ नये.

🤙 9921334545