गणपती बाप्पाला प्रिय अशा जास्वंदीच्या फुलाचे आरोग्यदायी फायदे

जास्वंदाचं फूल जितकं सुंदर दिसतं, तितकाच त्याचा विविध समस्यांवर याचा उपयोग होतो.तर जाणून घेऊया गणपती बाप्पाला प्रिय अशा जास्वंदीच्या फुलाचे फायदे.

कोंड्यामुळे केसात खाज सुटणे, मुरूमं येणे अशा समस्या निर्माण होतात. पण त्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा उपयोग करून घेऊ शकता. जास्वंद आणि त्याची पानं कुटून त्याची पावडर बनवा अथवा बाजारातही जास्वंदीच्या फुलाची पावडर मिळते. त्यामध्ये तुम्ही हिना अथवा मेंदी मिक्स करा, त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून हे मिश्रण केसांना लावा. एक तासानंतर केस धुवा. यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत मिळते.

अनेक अभ्यासात जास्वंदाचं फूल हा केसगळतीवर उत्तम उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम नाही असंही सांगण्यात येतं. जास्वंदाच्या फुलामध्ये असणारे अँटीफंगल गुणधर्म हे स्काल्पवरील जीवाणू काढून टाकतात आणि त्यामुळे केसात खाज सुटणे, केसगळती होणे यासारख्या समस्या दूर होतात. जास्वंदीची ५-६ फुलं आणि पानं एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या. ती केसांना लावा आणि साधारण ३ तास तसंच ठेवा. त्यानंतर केस धुवा. काही दिवसातच याचा परिणाम दिसून येईल.

🤙 8080365706