
आयुर्वेदात बेलपत्राला अधिक गुणकारी मानले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकराला अधिक वाहिले जाणारे बेलाचे हे पान आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. बेलाच्या पानाचा कसा उपयोग होतो जाणून घ्या.
भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जास्त प्रमाणात बेलाच्या पानांचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? बेलाची पाने ही आपल्याही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. बेलपत्राशिवाय धार्मिक पूजा अपूर्ण मानली जाते. मात्र याच बेलपत्रामध्ये विटामिन ए, बी१, बी६ आणि विटामिन सी चा भरपूर खजिना आहे.बेलाच्या पानाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅससारख्या समस्येपासून सुटका मिळते. मुळात यामुळे पचनक्रिया योग्यरित्या सुरळीत झाल्याने या समस्येपासून सहजपणे सुटका मिळवू शकता. बेलाच्या पानात असणारे फायबर पोट स्वच्छ करून अॅसिडिटीपासून सुटका मिळवून देते.बेलाच्या पानातील असणारे विटामिन सी हे प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्यासाठी मदत करते. यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची २-३ पाने चावावीत. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासूनही दूर राहण्यास मदत मिळते.
वरील माहिती स्त्रोतांवरून उपलब्ध आहे याच्या तथ्याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.
