
कोल्हापूर : कोल्हापूर येथून विक्री झालेल्या कांद्यासाठी शासनाकडून अनुदान वाटप करण्यात येते.1 फेब्रु.ते 31 मार्च या कालावधीत विक्री झालेल्या 5 हजार 255 शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 350 रू. प्रमाणे एकूण 13 कोटी रुपये अनुदान रक्कम आज सहकार विभागाकडून ऑनलाईन वितरीत करण्यात आले.
यामध्ये 255 शेतकऱ्यांची कांदा विक्री वडगाव बाजार समितीतून तर 5 हजार शेतकऱ्यांचा कांदा कोल्हापूर बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्ड मधून विक्री झाला होता. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सहकार उपनिबंधक निळकंठ करे यांनी दिली.
