हॉकी स्पर्धेत श्री दत्ताबाळ हायस्कूलला द्वितीय क्रमांक

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महानगरपालिकास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेतील पंधरा वर्षाखालील शालेय नेहरू हॉकी स्पर्धेत श्री दत्ताबाळ हायस्कूल संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

विजेत्या हॉकी संघात शिवराज दिवे, हर्षवर्धन पाटील, मयुरेश पाटील, वीर पाटील, मयंक नलगे, गणेश लोखंडे, गुरुराज टिपुगडे, तन्मय फलके, प्रणव पाटील, विराज पाटील, शार्दुल जाधव, संकेत बंडागळे, सार्थक शिंदे, समर्थ हुंबे, अभिनव पवार, अर्जुन शिंदे यांचा समावेश होता. या संघाला क्रीडा शिक्षक समीर भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थेच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका पल्लवी देसाई, संस्थेचे सेक्रेटरी व माजी नगरसेवक निलेश देसाई, विश्वस्त वेद देसाई, संस्थेचे व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, रोहिणी शेवाळे यांचे प्रोत्साहन लाभले.