
आपण नेहमी ऐकतो की बर्फाने चेहऱ्याला मसाज केला पाहिजे. नियमितपणे चेहऱ्यासाठी बर्फाचा वापर केला तर त्याचा खूप फायदा आहे. नेमका याचा काय फायदा आहे? बर्फ लावल्याने काय फायदे होतात? स्किन केअर रुटीन मध्ये याचा कुठे समावेश करावा? वाचा
1. ग्लोइंग स्किनफेस आयसिंग म्हणजेच बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते. यामुळे पिंपल्सची समस्याही दूर होते. तसेच त्वचेची काळजी घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यामुळे चेहऱ्यावर अप्रतिम चमक येते.2. मुरुम बरे होतातचेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर बर्फाने फेशियल करा. खरं तर चेहऱ्यावर बर्फ लावून फेशियल केल्याने त्वचेची जळजळ कमी होते. यासह, मुरुम स्वतःच हळूहळू बरे होऊ लागतात. हे आपल्या छिद्रांचा आकार वाढण्यापासून प्रतिबंधित करते.3. डोळ्यांची जळजळ कमी होतेआईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते. त्यामुळे आईस मसाज नियमितपणे करावे. यामुळे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळातही हलकेपणा येतो.4. सनबर्नवर योग्य उपायअनेकदा उन्हात राहिल्याने चेहऱ्याची त्वचा जळते. तसेच सनबर्नसारखी समस्या ही उद्भवते. अशावेळी बर्फाने चेहऱ्यावर मसाज करून त्यावर उपचार करणे शक्य आहे. यामुळे चेहऱ्यावरील पुरळांपासून आराम मिळतो.