
कोल्हापूर : शहरातील यादव नगर शास्त्रीनगर वाय पी पवार नगर आदी उपनगरात गेल्या सहा महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाले आहे या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक नियाज खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना नियाज खान म्हणाले जनतेच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवावा म्हणून महापालिका अधिकाऱ्यांना गेल्या सहा महिन्यापासून विनवणी केली जाते पण त्याकडे दुर्लक्ष केली जात आहे यादव नगर शास्त्रीनगर आधी परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पूर्ण होत नाही याबाबत जल अभियंत्यांना यंत्रांना जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केले आहे.
