कच्चा कांदा खाल्ल्यावर तोंडाचा किती वास येतो?

कांदा! अनेकजण असे आहेत ज्यांना कांदा खायला खूप आवडतो. कच्चा कांद्याचे सुद्धा खूप फॅन आहेत. पण तुम्हाला याची कल्पना असेलच की कच्चा कांदा खाल्ल्यावर तोंडाचा किती वास येतो. तोंडाला वास येत असेल तर मग करायचं? यावर काय उपाय आहे? जाणून घेऊया.

कांदा आणि लिंबाचा रसजेवण करताना कच्चा कांदा खायचा असेल तर तो लिंबाच्या रसात बुडवून खा. होय! लिंबासोबत जर कांदा खाल्ला तर त्याने तोंडाचा वास येत नाही. तोंडाचा वास येत असेल तर हा उपाय एकदा करून बघा. हा उपाय केलात तर तुम्ही रोज कांदा खाऊ शकता.बडीशेपबडीशेप माऊथ फ्रेशनर आहे. याने तोंडाचा वास येत नाही. जर तुम्ही जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर त्यानंतर बडीशेपचे सेवन करू शकता.

बडीशेप न चुकता खा, तोंडाचा वास येऊ नये म्हणून चांगला उपाय आहे. बडीशेप सारखेच इतरही काही माऊथ फ्रेशनर असतील तर तुम्ही तेही खाऊन तोंडाचा वास दूर करू शकता.वेलचीवेलची सुद्धा माऊथ फ्रेशनर आहे. तोंडचं आरोग्य सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वेलची खाताच तुम्हाला फरक दिसेल. हे माऊथ फ्रेशनर पचनासाठी देखील उत्तम असतात, ते पचनात मदत करतात. वेलचीचा सुगंध तीव्र असतो.

🤙 9921334545