
कोल्हापूर: शाळांच्या भौतिक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यास मी सदैव कटिबध्द आहे,अशी ग्वाही आमदार प्रा.जयंत आसगांवकर यांनी दिली.
मेन राजाराम हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मेन राजाराम हायस्कूलचे माजी विद्यार्थी व मुंबई उच्चन्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी यशस्वी विद्यार्थी आदिती कांबळे, प्रनीशा कांबळे, श्रावणी कांबळे राखी गवळी, अरिहंत जाधव, सानिका चेचर, गणेश भोर, श्री वर्धन पाटील, सार्थक यादव, महेश नदाफ, अथर्व मिटके या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत हे संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक उप प्राचार्य गजानन खाडे यांनी केले, आभार सपना माने यांनी मानले.
