
प्र.चिखली : करवीर तालुक्यातील वरणगे येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून एकाच गटातील अंतर्गत तीन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली.

तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडीवरून गावातील झालेल्या तंट्याचे पर्यावसन खुर्च्या, फेकून मारून एकमेकाला जखमी करण्याच्या घटनेने ग्रामस्थ हे अवाक् झालेकरवीर तालुक्यातील वरणगे येथील राजकारणात अलीकडे काही छोट्या गटांनी एकत्र येऊन राजकारणात एक भक्कम पर्याय निर्माण केला या एकत्रित गटाकडे सध्या गावातील ग्रामपंचायत सेवा संस्था दूध संस्था अशा सर्वच संस्थांची सत्ता आली आहे. साधारण तीन-चार गट एकत्र आल्यामुळे हा गट भक्कम झाला आहे. गतवर्षी विरोधकांना भक्कम पर्याय व्हावा या दृष्टीने गावातील करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी आंग्रे, लोकनियुक्त सरपंच युवराज शिंदे कुंभी कारखान्याचे माजी संचालक- बळवंत पाटील येथील हनुमान सेवा संस्थेचे चेअरमन- रामकृष्ण पाटील, माजी सरपंच -नामदेव पाटील माजी सरपंच- विलासराव पाटील आदी स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन या गटाची बांधणी भक्कम पद्धतीने केली होती पर्यायाने गावातील सर्व सत्ता काबीज करणे या गटाला सहज शक्य झाले. मात्र कारभारी वाढल्यामुळे सुरुवातीपासूनच या मोठ्या गटात छोट्या छोट्या गोष्टीवरून वादावादी होत होती. गेली. अंतर्गत वाद गटनेत्यांकडून मिटवण्यात येत होते. आज मात्र तंटामुक्त समिती बैठकीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.त्याचे असे झाले. येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीसाठी आज येथील भैरवनाथ मंदिरामध्ये बैठक बोलावण्यात आली होती गेल्या अनेक वर्षापासून या पदावर येथील पांडुरंग पाटील हे विराजमान होते त्यांना बदलून नवीन अध्यक्ष निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली.
तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी गटातील दोन-तीन अंतर्गत गटाकडून तिघांची नावे चर्चेत होती मात्र तंटामुक्त अध्यक्ष आपल्याच गटाचा व्हायला पाहिजे अशी आग्रही मागणी अंतर्गत तीन गटांकडून झाली आपलाच अध्यक्ष या कारणावरून तंटा निर्माण झाला या तंट्या चे पर्यावसन हाणामारीत झाले यावेळी एकामेकाला खुर्च्या फेकून मारणे हातात येईल ती वस्तू फेकून मारणे असे प्रकार घडले यावेळी अश्लील शिवीगाळ प्रचंड गदारोळ आणि प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
तंटामुक्तीच्या निवडी वेळीच तंटा निर्माण होऊन हाणामारी झाल्याने गावामध्ये दिवसभर या घटनेची चर्चा रंगली. दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हतीया घटनेमुळे या एकत्रित येऊन निर्माण झालेल्या बड्या गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे निष्पन्न झालेयेथील भाऊराव नाथ मंदिरामध्ये नेहमीच भक्तिमय वातावरण असते मात्र आज तंटामुक्त बैठकीत घडलेल्या गदारोळामुळे गावाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे… दरम्यान या घटनेमुळे गावची सत्ता एक हाती घेतलेल्या मोठ्या गटांमध्ये वाद झाल्यामुळे त्याचे पडसाद भविष्यात वरणगेच्या राजकारणावर नक्की उमटणार आहेत
👉 आचारी वाढले आणि रस्सा बिघडला…. वरणगेच्या राजकारणात अभूतपूर्व बदल घडवत सर्व सत्ता एक हाती मिळवणाऱ्या या एकत्रित गटांमध्ये कारभारी वाढले आणि वाद निर्माण होत गेला. आजच्या हाणामारीमुळे आचारी वाढले आणि रस्सा बिघडला अशीच प्रतिक्रिया गावातून उमटत आहे.
