बालींगा गावांमध्ये एसटी थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

बालिंगा: बालिंगा तालुका करवीर येथे गेले कित्येक वर्ष के.एम.टी सेवा बंद असून या मार्गावर फक्त शिरोली व कोगे बस वाहतूक चालू आहे. या पुर्वी बालिंगा गावामध्ये के.एम.टी ची सेवा चालू होती त्यामुळे एस.टी.मध्ये प्रवासी घेतले जात नव्हते.

परंतु बालिंगा गावामधून एसटी वाहतूक मुबलक प्रमाणावर चालु आहे. एसटीचे चालक व वाहक बालिंगे गावांमध्येच एसटी थांबवून प्रवाशांना एसटीमध्ये घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सकाळी सकाळी विद्यार्थी वर्ग शाळेला महाविद्यालयला जात असतात तसेच सकाळी सात ते दहा नोकरदार प्रवाशांची संख्याही भरपूर आहे, परंतु एसटीची कर्मचारी एसटी थांबवत नसल्याने सर्व प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यामध्ये एसटी महामंडळाचाही तोटा आहे. एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या चालक व वाहक यांना बालिंगा गावामध्ये एसटी थांबवून प्रवाशांना घेण्याच्या सक्त सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून प्रवाशांची सोय होईल आणि महामंडळही फायद्यामध्ये येईल.