कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी

कोल्हापूर : दोन महिन्याहून अधिक काळ रिक्त असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंजूलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त म्हणून बुधवारी 23 ऑगस्ट रोजी मंजू लक्ष्मी पदभार स्वीकारणार आहेत. राज्य सरकारने मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला.  तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांची 3 जून रोजी कोल्हापुरातून बदली झाली. बलकवडे यांच्या बदलीनंतर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पद रिक्त होते.

दोन महिन्याहून अधिक काळ पद रिक्त राहिल्याने विरोधी पक्षाकडून सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका सुरू होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आयुक्त कधी देताय अशा शब्दात जाब विचारण्यात आला होता. सामाजिक संघटना व विरोधी पक्षाने आयुक्त लवकर मिळावा यासाठी जोरदार आंदोलन केलीत.

🤙 8080365706