राजर्षि शाहू गव्हर्मेट बँकेतर्फे 17 सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण समारंभ

कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू गव्हर्मेट सर्व्हन्ट को- ऑप बँकेमार्फत सभासदांच्या मुलींसाठी “पद्माराजे पारितोषिक” रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ रविवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता प्रतिभानगर हौसिंग सोसायटी हॉल येथे आयोजित केलेला आहे.

सभासदांच्या मुलींनी व मुलांनी या पारितोषिकांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी पत्रकाव्दारे केले आहे.जाधव यांनी दिलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे ज्या सभासदांच्या मुली सन 2022- 2023 या शैक्षणिक वर्षात सरासरीप्रमाणे श्रेणी ब नुसार 61% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवून इयत्ता 4 थी ते 8 वी उत्तीर्ण झाल्या आहेत तसेच ज्या मुलींनी इयत्ता 9वी, 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 80% गुण मिळवले असतील त्यांनाच पद्माराजे पारितोषिक निधीतून बक्षिसे दिली जातील विशेष प्राविण्य मध्ये बँकेच्या सभासदांच्या मुले / मुली यांनी सन 2022 – 2023 या सालामध्ये केंद्रिय स्तरावर ,व राज्य स्तरावर कला, क्रिडा, साहित्य व इतर विषयात प्रथम किंवा व्दितीय क्रमांकाने गौरविलेल्या आहेत अशी मुले व मुली अथवा सभासद सुध्दा या निधीतून बक्षिस मिळण्यास पात्र राहतील.

तसेच ज्या सभासदांच्या मुलांनी सन 2022- 2023 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी व इ. 12 वी परिक्षेत जास्तीत जास्त गुण प्राप्त केले असतील त्या पैकी गुणांनुक्रमे पहिले फक्त पाच विद्यार्थी कै. छन्नुसिंग चव्हाण पुरस्कार मिळण्यास पात्र ठरतील.तरी सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनी व पात्र मुलामुलींकरीता सभासदांनी त्वरित या बाबतचे अर्ज गुणपत्रिकेच्या साक्षांकित सत्य प्रतिसह बँकेच्या प्रधान कार्यालय अथवा नजिकच्या शाखांमध्ये शुक्रवार 8 सप्टेंबर 2023 सादर करावेत. अर्ज सादर करीत असतांना त्या मध्ये सभासदांचे संपूर्ण नाव, पत्ता, फोन क्रमांक, सभासद क्रमांक आणि ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक पाल्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा. असे या पत्रकात म्हटले आहे.