सध्या डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप वेगाने वाढला आहे. अशा परिस्थितीत त्यापासून कसे वाचावे आणि प्लेटलेट्सची संख्या कशी वाढवावी ते जाणून घेऊया.
अशा परिस्थितीमध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण घामामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. अशा वेळी भरपूर द्रव आहार घ्यावा, तसेच इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेय सेवन करावे. पाण्याव्यतिरिक्त तुम्ही नारळ पाणी, सूप आणि ताजे रस यांच सेवन करू शकता.
ही फळं खाऊ शकताडेंग्यू किंवा मलेरियाने त्रस्त असलेले रुग्ण हे केळी, पपई, टरबूज, खरबूज यांसारखी मऊ फळे आहारात घेऊ शकतात. ती पचायला सोपी असतात आणि त्यात असलेली नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देते.
या भाज्या खाव्यातडेंग्यू मलेरियाने त्रस्त असलेल्यांनी आहारात भोपळा, गाजर, पालक यांसारख्या सहज पचणाऱ्या भाज्यांचे सेवन करावे. यात भरपूर फायबर आणि लोह असते, ज्यामुळे प्लेटलेट्सची संख्या वाढते.
आलं खावं आल्यामध्ये दाहक-विरोधी अर्थात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ते सेवन केल्याने मळमळ कमी होते तसेच आणि पचन सुधारते. अशावेळी आल्याचा चहा पिऊ शकता किंवा सूपमध्ये, भाजीमध्येही आलं किसून घालू शकता.
लसूण लसणामध्ये देखील अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. अशा स्थितीत डेंग्यू किंवा मलेरियाने बाधित व्यक्तींनी त्यांच्या आहारात लसणाचा समावेश करणे आवश्यक आहे.
दही दही हे आपले पाचन तंत्र ठीक करते, त्यामध्ये प्रीबायोटिक तत्व असतात, जी आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही दह्याचा आहारात अवश्य समावेश करू शकता.व्हिटॅमिन सी युक्त पदार्थलिंबूवर्गीय फळे, भोपळी मिरची, लिंबू, संत्री यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ सेवन करावे. त्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.