शिवसाई विद्यार्थी दत्तक योजना प्रेरणादायी : उद्योगपती प्रणव जाधव

कोल्हापूर : गेली २१ वर्षे गरजू विद्यार्थ्यासाठी सुरू असलेली ‘ शिवसाई विद्यार्थी दत्तक योजना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरोज ग्रुपचे संचालक प्रणव जाधव यांनी केले.

वडणगे येथील शिवसाई कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी देवी पार्वती हायस्कूलमधील १८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सुनिल पाटील होते. प्रणव जाधव म्हणाले, आमचे आजोबा कै. बापूसाहेब जाधव यांच्या प्रेरणेतून त्यांचा समाजकार्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शिक्षणासाठी केलेले सहकार्य हे समाधान देणारे आहे.डॉ

सुनील पाटील यांनी सांगितले की, शिवसाई मंडळाने २१ वर्षे या उपक्रमात सातत्य ठेवले आहे. तरुण मंडळानी याचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी गेल्या २१ वर्षात ७० विद्यार्थी मंडळाने दत्तक घेतले आहेत. या उपक्रमाची व्याप्ती वाढविणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हायस्कूलचे पी.डी.पाटील, के.व्ही.इरुडकर यांनी उपक्रमासाठी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

यावेळी डॉ अजित देवणे, डॉ समीर कोतवाल यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला उद्योगपती शिवाजी पाटील, वडणगे फुटबॉल क्लबचे अध्यक्ष रवी मोरे, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, सुनिल पाटील, संभाजी चव्हाण ,योगेश माने, विराज पाटील, महेश पाटील, शुभम पाटील ,अनिल पाटील उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिकाआर. पी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सी .डी. शिंदे यांनी केले सूत्रसंचालन आर. बी. देवणे यांनी केले. कार्यक्रमाला स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते