कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधन धोक्यात!! लम्पीने साडेचार हजार जनावरे बाधित..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसायात आग्रेसर आहे. या व्यवसायावर लाखो कुटुंबे अवलंबून आहेत.पण हा व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील ४६७५ जनावरांना लम्पी हा चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाला असून विशेष धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३५८ जनावरे दगावली आहेत.

अद्याप १५६२ जनावरांवर उपचार सुरू आहे.या घटनेने दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेला बळीराजा भितीच्या छायेखाली आहे.

कोल्हापूर जिल्हा हा दुग्धव्यवसायात आग्रही आहे.या व्यवसायावर लाखो कुठुंबाचे अर्थकारण चालते. गोकुळ , वारणा सारख्या दुध संघाकडून मुंबईसह अनेक शहराची दुधाची तहान भागवली जाते.

जिल्ह्यात दोन लाख ८४ हजार गायवर्ग पशुधन आहे. पण गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील जनावरांना लम्पी चर्म रोगाने ग्रासले आहे. आज पर्यंत ४६७५ जनावरांना या रोगाचा फटका बसला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग चांगलाच खडबडून जागा झाला आहे.दिड लाख जनावरांना लस दिली असली तरी अद्याप १५६२ जनावरे या रोगाने त्रस्त आहेत.

त्यांच्यावर जिल्हा परिषदेच्या १३९ जनावरांच्या दवाखान्यातून उपचार सुरू आहेत. सर्वाधिक ५०९ जनावरे करवीर तालुक्यातील तर त्या पाठोपाठ ३८०जनावरे कागल व २५९ जनावरे राधानगरी आणि १७७ जनावरे भुदरगड तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे आता पर्यंत ३५८ जनावरे दगावली आहेत.याचा असंख्य शेतकऱ्यांना फटका बसला आहे तर या रोगाने त्रस्त हजारो जनावरांचे लाखो लिटर दुध उत्पादन कमी झालेने शेतकऱ्यांसह दुधसंघांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.