प्रेशर कुकरमुळे स्वयंपाक करणे खूप सोपे झाले म्हणून प्रत्येक गृहिणी त्याचा जास्तीत जास्त वापर करू लागली. पण प्रेशर कुकर मध्ये ठराविक गोष्टीच शिजवाव्या लागतात. चला तर जाणून घेऊयात प्रेशर कुकर मध्ये काय शिजवावे आणि काय शिजवू नये याविषयी माहिती पाहणार आहोत.
प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यावर पास्तामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त वाढते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत, कढईत पास्ता शिजवणे किंवा तळणे हा पास्ता बनवण्याचा उत्तम मार्ग मानला जातो.भाज्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे यांचा समावेश असतो, जे प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यावर पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. बहुतेक भाज्या, विशेषत: हिरव्या पालेभाज्या, कढईत शिजवल्या पाहिजेत जेणेकरून त्यांची पोषकता कमी होणार नाही.
आपण बटाटे बहुतेकदा प्रेशर कुकरमध्ये शिजवतो, पण प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. पण तरीही तुमच्याकडे बटाटे शिजवण्यासाठी केवळ कुकरच असेल तर भरपूर पाणी घालून ते उकळल्यानंतर ते बटाटे चांगले धुवून घ्यावे.अनेकजण मासेही शिजवण्यासाठी कुकरच वापरतात पण प्रत्यक्षात हा अत्यंत चुकीचा मार्ग आहे. मासे खूप लवकर शिजत असल्याने, प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यांची चव खराब होऊ शकते. अशावेळी मासे ओपन पॅनमध्ये शिजवणे नेहमीच चांगले असते.