ईडीची मोठी कारवाई

जळगाव : ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाने जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि माजी खासदार ईश्वर लाल जैन यांच्या सहा कंपन्यांवर मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे.

पार्टीला मिळालेली फंडिंग आणि कागदपत्रांसह अनेक कारणांमुळे चौकशी सुरु आहे. या कारवाईमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत खळबळ उडाली आहे. जळगाव आणि नाशिकच्या एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून या सगळ्या ठिकाणी तपास सुरु होता. कुठल्या कारणामुळे चौकशी झाली ते समजू शकलेलं नाही. काही राजकीय कारणांमुळे ही चौकशी झाल्याच काही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं.