कुंभी कासारी परिसर नागरी समितीने घेतली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट

बालिंगा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हान कोल्हापूर येथे संपर्क दौऱ्यात आले असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जागा ही काँग्रेसला मिळावी आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे यांना उमेदवारी द्यावी आणि ती उमेदवारी का देण्यात यावी यासंदर्भात कुंभी कासारी परिसर नागरिक कृती समितीने अशोकराव चव्हाण यांना निवेदन देऊन आज सविस्तर चर्चा केली.

या वेळी अशोक चव्हाण यांनी म्हंटले की, कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत.या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. मात्र येणारे निवडणुकीत यातील एक जागा काॅंग्रेसने लढावयाला हवी, या करीता मी वरीष्ठ पातळीवर चर्चा करण्यासाठी तयार असलेचे आश्वासन या वेळी त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी कुंभी कासारी परिसरातील प्रमुख नेते एस. के. पाटील माजी जि.प. सदस्य, एकनाथ पाटील अध्यक्ष यशवंत बँक, हिंदुराव तोडकर उपाध्यक्ष यशवंत बँक, दादूमामा कामीरे, सर्जेराव जोती पाटील, दिनकर पाटील, शाहु काटकर संचालक केडीसीसी बॅंक, संभाजी आकाराम पाटील संचालक मार्केट कमिटी, जि.डी. पाटील, अविनाश पाटील, हिंदुराव कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.