दुधासोबत या गोष्टींचे सेवन हानिकारक

कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे अनेक घटकांचा समावेश दुधामध्ये असतो. पण काही पदार्थ दुधासोबत खाल्ल्यास आपल्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

दूध प्यायल्यानंतर कधीही दही खाऊ नये. तसेच दह्याचे दुधाबरोबर कधीही सेवन करू नये. दही आणि दुधाचे एकत्र सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पोटाची समस्या होण्याची शक्यता असते.शक्यत: दुधाबरोबर आंबट फळांचे सेवन करणे टाळावे. दूध आणि आंबट पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.गूळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. अनेक लोक दुधात गूळ घालतात.

दूध आणि गुळाचे एकत्र सेवन करणे हानिकारक ठरू शकते. यामुळे पोटाच्या समस्या होऊ शकतात.मासे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण, दुधासह माशांचे सेवन करणे टाळावे.

दुध आणि मासे यांचे एकत्र सेवन केल्यास पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात.तसेच यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.दुधाबरोबर मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्सचा धोका तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.