विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उत्तम प्लेसमेंटसाठी कटीबद्ध : अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील

कसबा बावडा/वार्ताहर: डी. वाय.पाटील विद्यापीठाची नव्याने सुरू झालेली अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्था आणि डी वाय पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा या दोन्ही संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व उत्तम प्लेसमेंट देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. डी. वाय. पाटील ग्रुपमधील प्रवेशामुळे आपल्या उज्वल करिअरची निश्चिती झाली आहे, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केली.

दोन्ही संस्थामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात डॉ. पाटील बोलत होते. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डी. वाय पाटील अभिमत विद्यापठाच्या नव्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थेतील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा ‘ओरिएन्टेशन’ समारभात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही मालदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. अॅडमिशन विभागप्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी, प्रा. आश्विन देसाई, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. नवनीत सांगळे, प्रा. अभिजित मठकर, सीएचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. अद्वैत राठोड यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख प्राध्यापक आणि २ हजाराहून अधिक विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते.

डॉ. संजय पाटील यांनी डी. वाय. पाटील विश्वास दाखवणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. या संस्थेला ४० वर्षाचा गुणवत्तापूर्ण वारसा लाभला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या संस्थेचे हे पाचवे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. आमच्या सस्थामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी उत्तम अभियंते बनण्याबरोबरच नोकरी-उद्योगासाठी परिपूर्ण विद्यार्थी बनतील असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. दोन्ही संस्थामध्ये प्रथम वर्षासाठी विविध शाखांमध्ये सर्वोच्च गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या 14 विद्यार्थ्यांना ‘सौ शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप’ देण्याची घोषणा डॉ. पाटील यांनी केली.

या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाची शंभर टक्के फी माफ केली जाणार आहे.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, डॉ. डी. वाय पाटील यांनी दिलेला गुणवत्तेचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. माजी विद्यार्थी ही आमची मोठी संपत्ती आहे. विविध क्षेत्रात नाव कमावलेले अनेक विद्यार्थी आम्ही ‘डी. वाय. पी’चे विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगतात हिच आमच्यासाठी मोठी पावती आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगली प्लेसमेंट मिळावी यावर आमचा भर आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमलबजावणी करणाऱ्या मोजक्या खासगी संस्थामध्ये आमचा समावेश आहे. गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड आम्ही आजपर्यंत केलेली नाही व पुढेही करणार नाही. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे यानी प्रास्ताविकामध्ये गौरवशाली भारतीय शिक्षण परंपरेची माहिती दिली. आपल्या पाल्याने योग्य ठिकाणी प्रवेश घेतला असून येथून तो परिपूर्ण अभियंता म्हणूनच बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी संपूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रम, परीक्षा यांच्या नियोजनाची माहिती प्रेझेन्टेशनद्वारे दिली. अभियांत्रिकी महविद्यालयाने उत्तम प्लेसमेंट रेकॉर्ड असून यावर्षी पदवी पूर्ण होण्यापूर्वीच 680 हून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारे नव्या महाविद्यालयातहि प्लेसमेंटच्या संधी मिळवून दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांची भूमिकाही महत्वपूर्ण असून त्यांनी सतत महाविद्यालयाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल म्हणाले, पालक व शिक्षक हेच आपले गुरु आहेत हे विद्यार्थ्यानी सतत ध्यानात ठेवावे. तुमची निवड अचूक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर संस्थेचा नेहमी भर राहिला आहे, यापुढं ही राहील अशी ग्वाही दिली. या दोन्ही संस्थातील विद्यार्थी उत्तम अभियंते बनण्याबरोबरच नोकरी-उद्योगासाठी परिपूर्ण विद्यार्थी बनतील असा विश्वास व्यक्त केला.प्रा. सुनंदा शिंदे व प्रा. मधुगंधा मिठारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. व्ही.भोसले यांनी आभार मानेल.