गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. घराच्या बाल्कनीतही तुम्ही गवती चहाचं रोप लावू शकता. यासाठीच गवती चहाचे हे आरोग्यदायी फायदे अवश्य वाचा.
आजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते. बऱ्याचदा घरातील कुंडीतच गवतीचहा लावला जातो. जर तुम्ही गवतीचहाच्या पाती स्वच्छ धुवून चघळल्या तर तुमचे दात आणि हिरड्या स्वच्छ आणि मजबूत होण्यास मदत होऊ शकते. कारण त्यामुळे तुमच्या तोंडातील जीवजंतू कमी होतात आणि तोंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पावसाळ्यातीस सततचा ओलावा आणि उबदारपणा जीवजंतूंसाठी पोषक असतो. या काळात फंगल इनफेक्शनचा त्रास वारंवार होऊ शकतो. या फंगल इनफेक्शनला टाळण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. गवतीचहा मधील पोषक घटक तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शनचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार गवती चहा पिण्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नक्कीच नियंत्रित राहू शकतं. मात्र ते प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर अवलंबून आहे. कारण जर तुमचे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण फारच अनियंत्रित असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी औषधोपचार घेणंच गरजेचं आहे. मात्र सुरूवातीच्या काळात तुम्ही त्यावर नियंत्रित ठेवण्यासाठी गवती चहा घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो. बरेचदा आपण सकाळी फ्रेश वाटण्यासाठी अथवा दिवसभरात कामाचा कंटाळा आला की थोडं रिफ्रेश होण्यासाठी चहा घेतो. मात्र जर यासाठी तुम्ही गवती चहा घेतला तर तुम्हाला पटकन ताजंतवानं वाटू शकतं. काही संशोधनानुसार गवती चहा नियमित आणि प्रमाणात घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावापासुन आराम मिळू शकतो. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शांत झोप येण्यासाठी काही लोक लेमनग्रास ऑईलचा वापरदेखील करतात.