
आजच्या काळात देशातील जवळपास प्रत्येकाचे बँक खाते आहे. अनेकदा बँका आपल्या खात्यातून पैसे कापतात. असे पैसे कधी आणि किती वेळा कापले जातात ते आज जाणून घेऊ या.

डेबिट कार्ड शुल्क ः बँकांकडून ग्राहकांना डेबिट कार्ड मिळते.या कार्डसाठी बँक ग्राहकांकडून शुल्क आकारते. हे वार्षिक शुल्क असते.
देखभाल शुल्क ः सर्व बँक खाती सुरळीत चालवण्यासाठी बँक ग्राहकांकडून देखभाल शुल्क घेते. सर्व बँकांमध्ये हे दर वेगवेगळे आहेत. बँकेच्या नियम आणि अटींद्वारे तुम्ही या शुल्काविषयी जाणून घेऊ शकता.
एटीएम चार्ज ः तुम्ही एखाद्या बँकेचे ग्राहक असाल तर त्या बँकेतून महिन्याला ठरावीक वेळा पैसे काढताना शुल्क आकारले जात नाही. मात्र जर तुम्ही दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरता तेव्हा त्यासाठी एटीएमचे शुल्क भरावे लागते.
खात्यात कमी शिल्लक ः जर ग्राहकाच्या खात्यातील रक्कम किमान ठेवीपेक्षा कमी असल्यास बँक शुल्क आकारते.
डिजिटल पेमेंट शुल्क ः यूपीआय, आयएमपीएस, आरटीजीएस, नेफ्टसारख्या डिजिटल माध्यमातून पेमेंट करताना शुल्क भरावे लागते.
खाते बंद करण्याचे शुल्क ः जेव्हा एखादा ग्राहक त्याचे खाते बंद करतो तेव्हा बँक त्याच्याकडून शुल्क आकारते.