शेंगदाणे की बदाम? काय ठरेल जास्त फायदेशीर?

जाणून घ्या बदाम आणि शेंगदाण्यांमध्ये अधिक फायदेशीर काय ठरेल?

बदामाच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर त्यात भरपूर फायबर असतं. याशिवाय यामध्ये प्रथिनं, व्हिटॅमिन ई , कॉपर, फॉस्फरससह मॅग्नेशियम देखील आहे. दुसरीकडे, शेंगदाण्यांबद्दल बोलायचं झाल्यास, त्यात व्हिटॅमिन बी, थायामिन , व्हिटॅमिन बी-६ , व्हिटॅमिन बी-९, अँटीऑक्सिडंट्ससह अनेक खनिजे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जर तुम्ही मूठभर बदाम आणि शेंगदाणे समान प्रमाणात घेतले तर भाजलेल्या बदामामध्ये सुमारे १७० कॅलरीज, सुमारे ६ ग्रॅम प्रथिने आणि ३ ग्रॅम फायबर असतात. तर शेंगदाण्यामध्ये सुमारे १६६ कॅलरीज, सुमारे ७ ग्रॅम प्रथिने आणि सुमारे २ ग्रॅम फायबर असतात. यावरून हे समजते की व्हिटॅमिन बीच्या बाबतीत शेंगदाणे अधिक चांगले आहेत. तर व्हिटॅमिन ईसाठी बदाम हा एक चांगला पर्याय आहे. शेंगदाणे आणि बदाम दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. शेंगदाण्यांमध्ये बदामापेक्षा जास्त प्रोटिन्स असतात.

🤙 8080365706