
बालिंगा: बालिंगा येथील भोगावती नदीवरील पुलावरुन लहान वहानांची वहातुक सुरू होती , परंतु अवजड वहानांकरीता बंदी होती. या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग विभाग क्रमांक दोन कोल्हापूर चे उप अभियंता आर.बी. शिंदे यांनी आज एक परिपत्रक काढून कळविले आहे की राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभाग क्रमांक दोन कोल्हापूर या विभागाच्या आखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी कोल्हापूर -बालिंगे -कळे- साळवन ते गगनबावडा या रस्त्याच्या बालिंगा भोगावती नदी येथील अस्तित्वातील जुन्या दगडी कमानी पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याची पातळी धोका पातळी स्प्रिंग लेवल पेक्षा कमी झाली असल्याने सदर पुलावरून वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे व अवजड वहानांसाठी वाहतूक सुरू करण्यात येत आहे.

तसेच जर पुराच्या पाण्याची पातळीचा धोका पातळी स्प्रिंग लेवल वर पुन्हा गेल्यास सदर पुलावरून वाहतूक नाईलाजास्त फेर बंद करण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात येईल तरी स्थानिक नागरिकांनी व या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी शासनास सहकार्य करावे,असे कळवले आहे. तुर्तास पुराच्या पाण्याची लेव्हल कमी झालेने अवजड वहानास वहातुक सुरू करण्यात आली आहे.
