इंडो काउंटच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार: राजे समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील इंडो काउंट कंपनीतील कर्मचाऱ्यांची पगारवाढीचा करार व इतर मागण्याबाबत चर्चेची तयारी आहे. व्यवस्थापनाने ही सकारात्मक भूमिका घ्यावी. कंपनी व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष करू नये. कामगार जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील इंडो काउंट कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी पगारवाढीचा करार व इतर मागण्यांबाबत याआधी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यावेळी घाटगे यांच्या मध्यस्थीने व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये चर्चा होऊन कर्मचाऱ्यांनी पुर्ववत काम सुरू केले होते. मात्र व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा आठ दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या बैठकीवेळी घाटगे बोलत होते. या बैठकीस कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घाटगे पुढे म्हणाले कंपनी व कर्मचारी या दोघांचे हित जोपासण्याचे संस्कार स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू ग्रुपच्या यशस्वी व्यवस्थापनातून आमच्यावर केले आहेत.त्यातूनच याआधी व आताही मी कर्मचाऱ्यांना सबुरीने घेण्याबाबत सांगितले आहे. मात्र प्रशासनाकडून दिलेले शब्द पाळले जात नाहीत. या विषयात मला श्रेय मिळते म्हणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार असाल तर मला बाजूला ठेवून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.यावेळी जयवंत रावण व संतोष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी अरुण जकाते संताजी घोरपडे भिकाजी भोसले शिवाजी पाटील भारत बोरे शिवाजी कुंभार नामदेव भोसले तुकाराम चौगुले सतीश कोंडेकर बाळासाहेब पाटील रमेश पाटील श्रीकांत भावे साताप्पा कोथळे या कर्मचारी प्रतिनिधी सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत भिकाजी भोसले यांनी केले तर आभार राजेंद्र निकम यांनी मानले.

🤙 8080365706