
मुंबई : मागच्या 15 दिवसांपासून पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या चंद्रयान-3 साठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO आज रात्री एक अवघड मॅन्यूव्हर पार पडणार आहे.

14 जुलैला चांद्रयान 3 अवकाशात झेपावलं होतं. या मोहिमेच यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. चांद्रयान 3 अजूनही पृथ्वीच्या कक्षेत आहे. इस्रोने टप्याप्याने चांद्रयान 3 चा कक्षा विस्तार केला. आता महत्वाचा कक्षा विस्तार पार पडेल. त्यानंतर चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. 1 ऑगस्टला रात्री 12 ते 1 दरम्यान चांद्रयान 3 ला चंद्राच्या दिशेने नेण्याच मॅन्यूव्हर होईल. चांद्रयान 3 च्या प्रोपलजन मॉड्युलच इंजिन प्रज्वलित करण्यात येईल. चांद्रयान 3 ला गती देण्यासाठी हे मॅन्यूव्हर करण्यात येईल.
