महाबळेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात

महाबळेश्वर: महामार्गावरील घाट परिसरात ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. प्रिती बोधे असे मृत महिलेचे नाव असून, त्या महाबळेश्वर परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बस तसेच खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. बुलढाण्यातून लागोपाठ दोन बस अपघाताच्या घटना समोर आलेल्या असतानाच आता पुण्याहून महाबळेश्वरला निघालेल्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील घाट परिसरात ब्रेक फेल झाल्याने एसटी बस रस्त्याखाली गेली आहे. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

🤙 8080365706