वेतवडे येथे कमळा एकादशी निमित्य राम कृष्ण हरी जप

साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे

वेतवडे (ता. गगनबावडा) येथे पुरषोत्तम मास निमित्य कमळा एकादशी दिनी ‘हरिनाम ‘ एक दिवसीय जप करण्यात आला.

पहाटे काकड आरती करून विठ्ठल-रुखमाई ची विधिवत पूजा करून,.बळवंत दौलु शिंदे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. ” राम कृष्ण हरी ” या मंत्राचा 5 लक्ष 40 हजार जप करण्यात आला. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल….श्री ज्ञानदेव तुकाराम ” चा जय घोष करण्यात आला.

सायंकाळी “अधिक मास माहात्म्य ” या ग्रंथाचे वाचन व भजन असा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ह.भ.प. वारकरी राजाराम (बापू)शिंदे, विलास शिंदे,शाहू शिंदे, तुकाराम शिंदे, मारुती शिंदे, आनंदा आडाव,राजाराम गुरव, गुंडू सावंत आदींसह गावातील वारकरी महिला , मुले व पुरुष उपस्थित होते.

🤙 8080365706